![]()
बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत भावुक झाले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीला बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी मिळणार असल्याने आमदार राऊत यांन
.
बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत १२,५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यात त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. याअंतर्गत उपळाई ते जामगाव (ता. माढा) या जोडकालव्यावरील पाच वितरिकांच्या वितरिकांच्या माध्यमातून एकूण ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे या ५ पैकी १ वितरिका आहे. कोरफळे येथील वितरिकेद्वारे कोरफळे भागातील ९५० हेक्टर (२३७५ एकर) क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जोडकालव्यावरील इतरही ४ वितरकेंची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहे. कोरफळे येथील काम पूर्ण झाल्यानंतर या वितरिकेद्वारे प्रथमच पाणी सुटले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आनंद झाला. येथे आमदार राऊत यांच्या हस्ते जलपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सभापती विजय गरड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
टप्पा तीनसाठी ढाळे-पिंपळगावच्या तलावात पाणी नेणार, लाभ होईल भविष्यकाळातही आपण टप्पा तीनमध्ये तावडीच्या तलावातून ढाळे पिंपळगावच्या तलावात पाणी नेणार आहोत. त्यामधून नवीन २२ गावांना आपण पाणी देऊ शकतो. पाइपलाइनद्वारे पाणी दिल्याने ०.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याची लवकरच बैठक मंत्रालय स्तरावर होईल.
तेव्हा मी पाण्यामुळे कांद्याचे चांगले उत्पन्न घेतले या वेळी आमदार राऊत म्हणाले, त्याकाळी बंधारे नसल्याने सिमेंटच्या पोत्यात वाळू भरून व त्या पोत्यांचा ओढ्यात आडवा बांध घालून शेताजवळून वाहणाऱ्या ओढ्यावर बंधारा तयार केला. तेथील साठलेल्या पाण्याच्या आधारावर २० एकर कांद्याची लागवड केली व चांगले उत्पन्न मिळाले. त्यातून मी दोन एकर जमीन घेऊ शकलो. शेतीला पाणी मिळाले तर शेतकऱ्याची कशी प्रगती होऊ शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.