Headlines

मतदार यादी : 3 लाख 19 हजार 757फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण:एसआयआर पुनरीक्षणात पैठण तालुक्यात 99.85 टक्के ईएफ फॉर्मचे वाटप‎




विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) २०२६ अंतर्गत पैठण तालुक्यात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत ९९.८५ टक्के ईएफ फॉर्मचे वाटप पूर्ण झाले आहे. तालुक्यातील एकूण ३ लाख ३४ हजार ४४५ मतदारांपैकी ३ लाख ३३ हजार ९४७ मतदारांना ईएफ फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यापैकी ३ लाख १९ हजार ७५७ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशनचे प्रमाण ९५.६१ टक्के असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पैठण तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधींची सहविचार बैठक घेण्यात आली. या वेळी मतदार पुनरीक्षणाच्या कामाची सद्य:स्थिती, प्रगती आणि आगामी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी दिली. पैठण विधानसभा मतदारसंघातील ९ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच त्यांच्या अखत्यारीतील यादी भागांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत कोणतीही त्रुटी, अडचण किंवा आक्षेप आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, Anomalies मतदारांशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीची प्रक्रिया संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट केले. बैठकीस उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार वैशाली कांबळे, महसूल सहायक अमोल पाखरे, तसेच शिक्षक खेडकर, शुभम घटे, इम्रान शेख आदींसह नगरसेवक बजरंग लिंबोरे, रेखाताई कुलकर्णी, फाजलभाई टेकडी आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. १३०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे सुसूत्रीकरण मतदारांची संख्या १३०० पेक्षा अधिक असलेल्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अंदाजे पाच ठिकाणी नवीन मतदान केंद्रांची निर्मिती प्रस्तावित असून, १६ यादी भागांचे इतर यादी भागांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवरील मतदारसंख्या संतुलित होऊन मतदारांना सुलभ होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *