अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत बनावट आणि आरोग्यासाठी घातक अन्नपदार्थांच्या विक्रीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. अमेझॉनच्या प्रकरणानंतर आता ग्राहकांच्या दारात 10 मिनिटांत किराणा पोहोचवणारी प्रसिद्ध कंपनी ‘ब्लि
.
ब्लिंकिटच्या गोदामातील धक्कादायक वास्तव
7 ऑगस्ट 2026 रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मालाड येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.’च्या गोदामावर अचानक धाड टाकली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे आणि अत्यंत अस्वच्छतेचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले.
- झुरळांचा सुळसुळाट: फळे आणि भाजीपाल्याच्या साठवणूक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुरळे आणि कीटक आढळले, ज्यामुळे अन्न दूषित होण्याचा आणि ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.
- अयोग्य साठवणूक: अन्नपदार्थ थेट जमिनीवर आणि गंजलेल्या रॅक्सवर अस्ताव्यस्त टाकलेले आढळले. तसेच, साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या FIFO/FEFO (First In First Out) पद्धतीचे पालन केले जात नव्हते.
- मुदतबाह्य साठा: मुदतबाह्य (Expired) झालेले आणि पॅकेजिंगशी छेडछाड झालेले अन्नपदार्थ कोल्ड रूममध्ये विक्रीसाठी ठेवलेले आढळले.
- कचरा व कीटक नियंत्रणाचा अभाव: उंदीर आणि कीटक नियंत्रणासाठी गोदामात कोणतीही उपाययोजना नव्हती. तसेच कचरा व्यवस्थापन अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते.
- कर्मचाऱ्यांच्या नोंदी नाहीत: अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या.
- परवाना निलंबित: या गंभीर त्रुटींची तातडीने दखल घेत एफडीएने ब्लिंकिटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. या निलंबन काळात मालाडच्या गोदामातून अन्नपदार्थांची विक्री, वितरण किंवा कोणताही व्यवसाय सुरू ठेवण्यास कंपनीला सक्त मनाई करण्यात आली आहे.
दहिसरमध्ये दूध भेसळ कारखान्यावर छापा; 20 लाख बनावट पाऊचची विक्री
एफडीएच्या कारवाईसोबतच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-12 ने दहिसर (पूर्व) येथे एका बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. अमूल आणि गोकुळ यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यातील दूध काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळले जात होते. त्यानंतर त्याच पिशव्या पुन्हा सील करून त्या अस्सल दूध असल्याचे भासवून ग्राहकांना विकल्या जात होत्या.
470 लिटर भेसळयुक्त दूध जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 470 लिटर भेसळयुक्त दूध आणि अमूल कंपनीच्या 13 हजार रिकाम्या बनावट पिशव्या जप्त केल्या आहेत. बनावट दूध पॅकिंगसाठी वापरलेली सुमारे 10 लाख रुपये किमतीची मशिनरी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार तेलंगणातून ताब्यात
प्राथमिक तपासात या टोळीने आतापर्यंत अंदाजे 20 लाख बनावट दुधाचे पाऊच विकल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटची पाळेमुळे वसई-पालघरपर्यंत पसरलेली असून, 2021 पासून हे काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भेसळीची ही संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा…
मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!: गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल

गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी