![]()
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 6 तरुण कारने साताऱ्याच्या दिशेने जात होते. शिरवळ परिसरात आले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार महामार्गावरील दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. ही धडक एवढी तीव्र होती की कारचा चक्काचूर झाला. चार तरुणांचा जागीच मृत्यू या अपघातात वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत घटनेची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलिस आणि शिरवळ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. साताऱ्यात पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या सराईतावर पोलिसांचा छापा संगममाहुली पुलाच्या परिसरात बेकायदा पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आदेश पांडुरंग बिरामणे (वय 30, रा. धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा शहरात बेकायदा शस्त्रांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून संशयित व्यक्तींबाबत माहिती संकलित केली जात होती. याच तपासादरम्यान पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे सातहून अधिक गुन्हे दाखल असलेला आदेश बिरामणे हा संगममाहुली परिसरात पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित परिसरात सापळा लावला. रात्रीच्या वेळी संशयित पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला कारवाईची चाहूल लागली. त्याने अंधाराचा फायदा घेत तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परिसराला वेढा देत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. हे ही वृत्त वाचा पिंपरी-चिंचवडमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर 7 भटक्या कुत्र्यांचा हल्ला:डोक्यावर पडले 80 हून अधिक टाके, चिखलीतील भयानक घटना CCTV मध्ये कैद
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर 80 हून अधिक टाके पडले आहेत. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे. वाचा सविस्तर
Source link