Headlines

Sujat Ambedkar Attacks Sharad Pawar; Claims Alliance With BJP Since 2014


भारतीय जनता पक्ष जेव्हापासून सत्तेत आला आहे, तेव्हापासून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांच्या काळातील पॉलिसीच भाजपा राबवत आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबे

.

सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांना मजबूर करून भाजपासोबत जाण्यास शरद पवारांनीच भाग पाडले होते. अजित पवारांनाही त्यांनीच पाठवले होते, हे त्यांनी स्वतःच स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही ‘डिलिमिटेशन बिल’ संदर्भात होती. या बिलाच्या बाजूने मतदान करू, असे आश्वासन देण्यासाठीच खासदार सुप्रिया सुळे यांनी ती भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी अन् आता मातंग-बौद्ध वाद!

भाजपावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, देश आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू-मुस्लिम वाद भाजपानेच पेटवला. हे भांडण शांत होण्यापूर्वीच मराठा-ओबीसी वाद पेटवण्यात आला आणि आता मातंग-बौद्ध समाजात वाद लावण्याचे काम केले जात आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर ‘आरक्षण हटाव’ आंदोलन सुरू असून, सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आरक्षणच राहिले नाही, तर उपवर्गीकरण कशामध्ये लावणार? असा थेट सवाल उपस्थित करत, आरक्षण वाचवण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे असल्याचे म्हटले.

राम मंदिरात चोरी होत असेल, तर मोदी-योगींनी उत्तर द्यावे

भाजपाच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना सुजात आंबेडकर म्हणाले की, 2018 मध्ये ज्या लोकांनी ‘चौकीदार ही चोर आहे’ असे म्हटले होते, ते सर्व लोक बरोबर होते. नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ असे स्टेटस ठेवले होते, मग ते नक्की कसली चौकीदारी करत होते, हे त्यांनी सांगायला हवे. भाजपा हा माणुसकीच्या विरोधातील पक्ष असल्याने तो हिंदू विरोधी पक्ष आहे. गेली 20 वर्षे चर्चेत असलेला मुद्दा घेऊन त्यांनी भव्य राम मंदिर बांधले आणि त्याचा सोहळाही केला. परंतु, तिथे जर चोरी होत असेल, तर यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संबंध आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे आणि या प्रकरणी तातडीने कारवाई केली पाहिजे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *