![]()
पैठण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पैठण तालुका संघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, पैठण तालुकाध्यक्षपदी विलास शेळके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी विनोद तांबे यांची, सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल हजारे, तर पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर कपसे व रामदास पाटील गिधाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिलीप नाना बनकर, महानगराध्यक्ष यादवराव सूर्यवंशी, दशरथ मानोतकर, महेश उबाळे, उदय नाना तावर, कल्याण राठोड, रामदास डिघुळे, आबासाहेब चिंतामणी यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विलास शेळकेंची निवड:विनोद तांबे विधानसभा अध्यक्षपदी कापसे; गिधाने जिल्हा उपाध्यक्षपदी