रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिल्यावरून सुरू असलेल्या चर्चेला आमदार रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी स्नेहाचे संबंध आहेत, त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमांना राजकीय चष्म्यात
.
रोहित पवार म्हणाले, कोणत्याही उद्योजकाला चालू व्यवसाय बंद करून दुसऱ्या राज्यात जाणे परवडणारे नसते. मात्र, चाकण एमआयडीसीत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत, अतोनात वाहतूक कोंडी आहे आणि पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कंटाळून काही व्यावसायिक महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थलांतर करत असल्याचे समोर येत आहे. तरुणांना नव्या नोकऱ्या तर मिळत नाहीतच, पण आहे त्या नोकऱ्याही जात आहेत. दुर्दैवाने सरकारचे याकडे अजिबात लक्ष नसून ते केवळ राजकीय जोडतोडीत व्यस्त आहेत. राज्य सरकार काही ठिकाणी ज्या मोठ्या कंपन्या आणत आहे, त्यात रोजगार अत्यंत कमी मिळतो आणि पाणी व विजेचा प्रचंड वापर होतो. सरकारने महाराष्ट्रात गुंतवणूक आणताना स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळेल आणि चालू उद्योग कसे बंद पडणार नाहीत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

ही माझ्यासाठी मोठी गोष्ट
दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, तो पूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रम होता. आमच्या पिढीतील सर्वात मोठा भाऊ म्हणून मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करत होतो. पंतप्रधान जेव्हा येतात, तेव्हा काही ठरलेले प्रोटोकॉल पाळावे लागतात. एका साध्या आमदाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाने ओळखतात, ही माझ्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या मोठी गोष्ट आहे. सुप्रिया ताईंचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत, ज्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होते.
पावसाळी कामांचा बोजवारा
रोहित पवार म्हणाले की, पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि कामांसाठी जाहीर केलेला निधी केवळ कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात कुठेही कामे झालेली नाहीत. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे निष्पाप गरीबांचे जीव जात आहेत.
नाशिक कुंभमेळा कंत्राट घोटाळा
रोहित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांची कामे दिली जात असून, त्यापैकी 500 कोटी रुपयांचे कंत्राट आधीच मॅनेज करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. हे कंत्राटदार कोणाचे नातेवाईक आहेत आणि कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार आहेत, मात्र सरकारमधील घटकांचे लक्ष कामे करण्यापेक्षा पैसे खाण्याकडेच जास्त आहे.
शिक्षण क्षेत्राची दुरवस्था
रोहित पवार म्हणाले की, एकीकडे सरकार मराठी शाळा बंद करत आहे, तर दुसरीकडे आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये मुलांची अवस्था बिकट झाली आहे. तिथे मुले आजारी पडत आहेत, त्यांना साप चावत आहेत. या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी सरकार केवळ मराठी-अमराठीचा मुद्दा उपस्थित करून समाजात राजकारण शेकत आहे. हे ही वृत्त वाचा अमित शहांच्या दबावाखाली 5 हजार कोटींना शिवसेना विकली:शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे पण मोदींनी नकार दिला- संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार फोडणे, त्यांचा गुजरात ते गोवा प्रवास, आणि निवडणूक आयोग मॅनेज करणे यासाठी जनतेचा तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये निवडणूक आयोगाने दलालाची भूमिका पार पाडल्याचा घणाघात राऊत यांनी केला. वाचा सविस्तर