Headlines

‘केमिकल’द्वारे बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड:रसायनांद्वारे खऱ्या नाेटेची प्रतिकृती छापण्याची हाेती ‘माेडस ऑपरेंडी’




त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात केमिकल लिक्विड आणि विशेष कागदाच्या साहाय्याने ५०० रुपये दराच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव येथील ‘शिवकृपा’ बंगल्यात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ संशयित आरोपींविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील अमेश्वर सुधाकर आईथा (३७), दासरी प्रसाद सत्यई (३६) (दोघे रा. तेलंगण), गोकुळ आनंदराव दाते (५६, रा. ध्रुवनगर, गंगापूर रोड), हिरामण पुंजा दाते (५७, रा. तळेगाव), मच्छिंद्र भगवान घनदाट (रा. सातपूर) यांना अटक झाली. गोकुळ दाते याचा मित्र मोकळ याच्या मागावर पोलिस आहेत. ​स्थानिक गुन्हे शाखेचे शिपाई किशोर गजानन बोडखे यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. १० लाख रुपयांच्या वास्तविक चलनाच्या मोबदल्यात ३० लाखांच्या बनावटनोटा ही टोळी पुरवत असल्याचा संशय असून त्यांनी तेलंगणातहीनोटा पुरवल्या का, याचा तपास केला जात आहे. ​जप्त करण्यात आलेली रोख रक्कम ₹नऊ लाख ७५ हजार रुपये मारुती सुझुकी अल्टो कार (एमएच १५ बीएन १९३१), पाच ​अँड्रॉईड मोबाईल, ५०० रु. दराच्या केमिकल लावलेल्या पांढऱ्या व काळ्या बनावट नोटांचे १५ बंडल, विविध क्षमतेच्या बॉटल्स व कॅनमध्ये काळे व चॉकलेटी रंगाचे केमिकल, सोल्यूशन,नोटांच्या आकाराचे कापलेले कोरे कागद, ऑक्सिलाइफ हँडग्लोव्हज, झॅपटेप, लाकडी लाटणे, जर्मलचे घमेले असा एकूण ₹१२,१९,५८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. लाटणे वापरून केली बनावटनोट तयार ५०० रुपयांची नोट एका धातूच्या घमेल्यात रासायनिक द्रवात मिसळून घ्यायचे. त्यानंतर नोटांच्या आकाराचे कोरे व काळे कागदी बंडल एकत्र करून त्यावर रसायनात बुडवलेली नोट ठेवून ती कोऱ्या कागदावर लाटण्याने दाबून फिरवली जायची. त्यामुळे कागदावर हुबेहूब बनावट नोट व्हायची. खरीनोट रसायनात बुडवून लाटण्याच्या साहाय्याने कोऱ्या कागदावर त्याची प्रतिकृती तयार करतानाचा व्हिडिओच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यातून घेतलेले हे छायाचित्र.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *