![]()
एकेकाळी आशिया खंडात नावाजलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासनाने राज्य सरकारकडे ४७८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
.
१९५३ साली मिळालेले मूळ प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे गोळा करून ४७८ कोटींची प्रस्तावित निधीची फाईल राज्य सरकारकडे सादर केली आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होऊन निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सूतगिरणीच्या माध्यमातून काम सुरू असून, लूज कांदा खरेदीची व्यवस्था तसेच परिसरात मोठा फळबाजार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बाबुराव ढोकणे, बाबुराव पटारे, दिलीप ढोकणे, दिपक पंडित,अर्जुन दुशिंग, गीताराम चोथे, एस. एस. जाधव, भारत कोळसे, शिवाजी आडसुरे, उत्तम ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, गंगाधर आडसुरे, अशोक ढोकणे, शरद ढोकणे, भाऊ सासवडे, पिनू पटारे, संजय महाडिक, पप्पू ढोकणे, विजय माळवदे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालक वर्ग उपस्थित होता.
राहुरी तालुक्यातील रखडलेल्या हायस्कूलच्या कामांसाठी ६० टक्के लोकसहभाग मिळाल्यास शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध करून सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राहुरी कॉलेजमध्ये आठ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रोजेक्टर रूम, क्रीडा साहित्य आदी सुविधा वाढविण्यात येणार आहेत. नर्सिंग, आयटीआय, बी. फार्मसी, आयुर्वेदिक महाविद्यालयांसह स्पर्धा परीक्षा, सैनिक स्कूल व आयटी अभ्यासक्रमांच्या सुविधा निर्माण करण्याचा मानस तनपुरे यांनी व्यक्त केला.