![]()
राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जोकर आहेत, त्यांची स्वत:ची कॉमेडी सर्कस झाली आहे. राहुल गांधींनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, अशाच पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जोकरगिरी करत असतात. ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यक्रमात राऊतांचा उल्लेख जोकर म्हणून करण्यात आला हे महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांची बाजू पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ जेवढी मांडत नाही तेवढं राऊत प्रवक्ते म्हणून राहुल गांधींची बाजू मांडत असतात. ठाकरे अडचणीत आल्यावर गप्प बसणारे राऊत राहुल गांधी अडचणीत आल्यावर काँग्रेस प्रवक्त्याच्या पुढे येत बाजू लावून धरतात. खासदारकी मिळावी म्हणून त्यांच्याकडून हे सर्व सुरू आहे. चाकणच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार नवनाथ बन म्हणाले की, चाकणमध्ये काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्र्यांशी त्यावर चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग दुसरीकडे जावे अशी आमची भूमिका नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक कंपन्या गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये निघून गेल्या होत्या कारण तेव्हाचे मंत्री उद्योगांच्या बैठकीसाठी सुद्धा भेटत नव्हते. आता वाढवण बंदर आणि इतर सोयीसुविधा देण्याचे काम देवाभाऊंच्या राज्यात सुरू आहे. महाराष्ट्र कायम नंबर 1 नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रातून कंपन्या बाहेर जात आहेत बंद पडत आहेत असा आरोप आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड भूमिका मांडली आहे. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे खोटं पसरवण्याचे काम करत होते. शरद पवारांना सुद्धा असेच वाटले होते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी देत महाराष्ट्र नंबर 1 आहे हे सिद्ध केले आहे. ज्या कंपन्या कधीही सुरू झाल्या नाही अशा कंपन्याना स्ट्राइक केल्या. सध्या 21 लाख कंपन्या आहेत. जो आकडा गेल्या 10 वर्षांमध्ये तिपटीने वाढला आहे. महाराष्ट्र कायम गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे.
शरद पवारांनी रोहित पवारांवर विश्वास ठेवू नये- बन नवनाथ बन म्हणाले की, विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंकडून तर रोज हेच काम सुरू आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत माझे त्यांना सांगणे आहे की रोहित पवार, आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवू नका. ज्या कंपन्या कधी सुरूच झाल्या नाही त्या बंद झाल्याची आकडेवारी सांगूण दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. शरद पवारांनी अनेक वर्षे सत्तेत काम केले आहे त्यांना ही आकडेवारी कळेल.
हे ही वृत्त वाचा
केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही:अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून निवडणूक आयोगाने शेण खाल्लं– संजय राऊत अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले इथेच निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, त्यांनी आमचा बाजू कधीच ऐकूण घेतली नाही. या सर्व गोष्टीचे निर्माते अमित शहा हे आहेत, ते आता तोंड लपवून पळत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामाध्यमातून देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम करत असते. केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. वाचा सविस्तर
Source link