Headlines

विलासरावांच्या स्मृतिदिनी रितेश भावुक:म्हणाला – तुम्हाला जावून 14 वर्ष झाली, माझा वनवास काही संपला नाही!




महाराष्ट्रातल्या राजकारणातला अजातशत्रू, फर्डा वक्ता अशी ओळख असणारे राजबिंडे व्यक्तिमत्व म्हणजे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख. त्यांचा आज स्मृतिदिन. विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने अतिशय भावुक होत आपल्या बाबांच्या आठवणी जागवल्यात. रितेश यांनी विलासरावांसोबतच्या फोटोसह एक पोस्ट केली. त्यात फक्त एकच अतिशय हृदयस्पर्शी ओळ लिहिलीय. ‘तुम्हाला जाऊन 14 वर्ष झाली, माझा वनवास काही संपला नाही,’ असे म्हणत त्याने आपले दुःख व्यक्त केले. कायद्याचे पदवीधारक महाराष्ट्राचा लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र, दिवंगत विलासराव देशमुख यांचा सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा होता. दांडगा जनसंपर्क आणि फर्डे वक्तृत्व ही त्यांची अतिशय जमेची बाजू. विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी, बीए आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. सरपंचपदापासून सुरुवात वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे 1974 मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. तिथून त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलेच नाही. विलासरावांनी युवक काँग्रेस नेते, तत्‍कालीन एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य या पदांवरही त्यांनी काम केले. 1980 मध्‍ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षांत त्यांना मंत्रिपद मिळाले. दोन वेळा मुख्यमंत्री 18 ऑक्टोबर, 1999 ते 16 जानेवारी, 2003 व 1 नोव्हेंबर, 2004 ते 4 डिसेंबर, 2008 या कालखंडांत दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासरावांनी शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पाहिला. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. विलासरावांच्‍या वडिलांचे नाव दगडोजीराव, तर आईचे सुशीलादेवी होते. वैशाली यांच्‍यासोबत ते 29 मे 1975 रोजी विवाहबद्ध झाले. अमित, अभिनेता रितेश आणि धीरज हे विलासराव यांचे तीन मुले आहेत. 14 ऑगस्ट 2012 रोजी विलासरावांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *