![]()
देशाच्या संरक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या त्यागामुळेच सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत. सैनिकांच्या देशसेवेमुळे देश सुरक्षित असून, त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही, असे प्रतिपादन मुख्याधिकारी नागेश येवला यांनी केले. रोटरी क्लब कळवणच्या वतीने आयोजित आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश पाखले, सेक्रेटरी नितीन संचेती आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य विलास शिरोडे यांनी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. गणेश पाखले व नितीन संचेती यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल सैनिक पत्नी प्रतिभा पगार यांनी उपक्रमाचे कौतुक केले. या सोहळ्यामुळे कळवण तालुक्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सूत्रसंचालन भाऊसाहेब शिरोरे यांनी केले तर आभार नितीन संचेती यांनी मानले. यावेळी माजी सैनिक, रोटरीयन आदींसह नागरिक उपस्थित होते.
Source link
सैनिकांचे योगदान, ऋण कधीही फिटणार नाही:कळवणला आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्याधिकारी नागेश येवला यांचे प्रतिपादन