![]()
वाढते रस्ते अपघातांचे प्रमाण आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने ‘मिशन उडान’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत दुचाकीवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेटचा नियमित वापर करावा तसेच नशामुक्त जीवन अंगीकारावे, असा संदेश नागरिकांना देण्यात आला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनजागृती मोहिमेत बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ठाणेदार सुनील वानखडे म्हणाले की, “दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. अशा वेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास कायमचे दिव्यांगत्व येणे अथवा जीवितास धोका निर्माण होणे, अशा घटना घडतात. यामुळे कुटुंबाचे मानसिक व आर्थिक नुकसान होते. डोके, चेहरा आणि डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. डोक्याची सुरक्षा महत्वाची अपघाताच्या वेळी खाली पडताना डोक्यावर होणारा थेट आघात हेल्मेट शोषून घेते. मेंदूला होणाऱ्या गंभीर व प्राणघातक दुखापतींपासून बचाव होतो. प्रवासादरम्यान डोळे, चेहरा यांचे धूळ, कचरा व वाऱ्यापासून रक्षण होते, असा संदेश देण्यात आला.
Source link
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; तिरंगा रॅलींमधून जागर:बोरगाव मंजू पोलिसांकडून रस्ते सुरक्षेचे आवाहन