![]()
आज, १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राज्यात मात्र एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या संस्थेने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका पोस्टरवरून हा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडण्यात आली असून, यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत संभाजी भिडेंवर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पोस्टरमध्ये नेमके काय आहे? या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परमं पवित्र भगवाच असला पाहिजे’ हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे… हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा.” विशेष म्हणजे, या पोस्टरमध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याचे चित्र दाखवण्यात आले असून, त्यावर भारताच्या तिरंग्याऐवजी ‘भगवा ध्वज’ फडकताना दाखवण्यात आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंतांचा संताप आणि कारवाईची मागणी याच पोस्टरचा संदर्भ देत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी थेट राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करत आहेत. देशात ‘वंदे मातरम्’चा अपमान झाला तर शिक्षेची तरतूद आहे, मग अशा वेळी राष्ट्रध्वजाचा अवमान कसा काय खपवून घेतला जाऊ शकतो?” राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) निशाणा या प्रकरणी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडताना सावंत यांनी अप्रत्यक्षपणे संघावरही टीका केली. “ज्यांनी सलग ५२ वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नाही, त्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटत आहे. पण राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या भिडेवर हे सरकार आणि मुख्यमंत्री गुन्हा दाखल करणार का? ही आमची थेट मागणी आहे,” असे सावंत म्हणाले. संभाजी भिडेंची पोस्ट.. हेही वाचा.. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा ‘स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका’:पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
'अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असावा':शिवप्रतिष्ठानच्या पोस्टरवरून वाद, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी