Headlines

मुंबई हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत महाराष्ट्रभर तांत्रिक गोंधळ:अभिजित दिपकेंचा सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, संतापानंतर हायकोर्टाकडून गंभीर दखल




मुंबई हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रांबाहेर ठिय्या आंदोलन केले. या प्रकाराची हायककोर्टाच्या रजिस्ट्रारनेही दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळवले जाईल, अशी नोटीस जारी केली आहे. आठ दिवसांचा अल्टिमेटम दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सुराणानगर येथील बायटेझ टेक्नॉलॉजीज या परीक्षा केंद्रावर धाव घेत त्यांनीही विद्यार्थ्यांसोबतच ठिय्या मांडला. रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला परीक्षा यंत्रणा सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून यानंतर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. रविवारी सकाळी १० ते ११.१५ या पहिल्या सत्रात बायटेझ टेक्नॉलॉजीज, एमजीएम आणि सेव्हन हिल येथील परीक्षा केंद्रांवर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. अमित ठाकरे यांचाही फोनवरुन मुलांशी संवाद २० गुणांच्या या परीक्षेत अनेक संगणकांच्या स्क्रीन पिवळ्या-गुलाबी दिसत होत्या. काहींचे माऊस चालत नव्हते, तर स्पेस बटण दाबताच सिस्टिम आपोआप लॉगआऊट होत होती. अवघ्या पाच मिनिटांत अनेकांचे पेपर सबमिट झाले. त्यामुळे पहिल्या बॅचमधील सर्व उमेदवार एकाच वेळी अनुत्तीर्ण होतील, असा आक्षेप घेत उमेदवारांनी हायकोर्टाच्या प्रबंधकांना निवेदन दिले. मनसेचे अमित ठाकरे यांनीही फोनवरुन मुलांशी संवाद साधला. काँग्रेसच्या दीक्षा पवार, एसएफआयच्या मनीषा बल्लाळ, अरुण मते या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी आले होते. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. राज्यातील १,३३२ लिपिक पदांसाठी ११,६११ विद्यार्थी टायपिंग परीक्षेसाठी पात्र ठरले. संभाजीनगरमध्ये ३ केंद्रांवर २,९०० उमेदवार होते. सिस्टिम आणि सरकार फेल : अभिजित दिपके “परीक्षेला बसल्यावर समजले की कॉम्प्युटर काम करत नाहीत आणि सिस्टिम लॉगआऊट होत आहे. तरीही केंद्रचालक विद्यार्थ्यांची अक्कल काढत होते. यात विद्यार्थी नाही, तर संपूर्ण सिस्टिम आणि सरकार फेल झाले आहे,” असा घणाघात दिपके यांनी केला. सर्व सुविधा योग्यरीत्या पुरवून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीला त्वरित ब्लॅकलिस्ट करावे, असे दिपके म्हणाले. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेचा फज्जा:सर्व्हर डाऊन, किबोर्डही खराब; संतप्त विद्यार्थ्यांचा केंद्राबाहेरच ठिय्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *