Headlines

खुलताबाद:तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात; ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणला




भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन खुलताबाद तालुक्यात अत्यंत देशभक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी पोलिस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. शहर व तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष आमेर पटेल, पंचायत समिती कार्यालयात सभापती सुनिता खंडागळे, पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयातील मुख्य सोहळ्यास नगराध्यक्ष आमेर पटेल, पंचायत समिती सभापती सुनिता खंडागळे, उपसभापती मंदाबाई वाकळे, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, ॲड. कैसरोद्दीन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहेमद यांच्यासह नगरसेवक मुनिबुद्दीन मुजीबुद्दीन, शेख तौसीफ, अनिस जहागिरदार, वाजीद शेख, गजेंद्र फुलारे, अयाज बेग, माजी नगरसेवक योगेश बारगळ, मोहन तुपे, विविध अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, ग्रामपंचायती आणि सर्व शासकीय इमारतींवर सजावट करण्यात आली होती. देशभक्तीपर गीते, भाषणे आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष रंगतदार ठरला. तालुक्यातील शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुक्तानंद विद्यालय, कमला नेहरू विद्यालय, घृष्णेश्वर विद्यालय व नेमत उर्दू स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेतलेले विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *