Headlines

गौरव:शिल्लेगावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा गौरव




केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरण, गुणवंतांचा गौरव आणि शाळा विकासाच्या संकल्पाने हा सोहळा विशेष ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कावेरी राऊत आणि वैजनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी नारायणराव जाधव यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व १८२ विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलच्या पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले. संगीत कवायत, लेझीम प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते सातवीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्ती (८ विद्यार्थी), मंथन व नवोदय परीक्षेत यश मिळवणाऱ्या ३० हून अधिक गुणवंतांना आनंद जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पंचायत समिती सदस्य शुभम बोराडे यांनी शाळेसाठी १० संगणक देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. सोहळ्यास केंद्रप्रमुख अंकुश रावते, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कडूबाळ महाराज गव्हादे व सुवर्णा बोरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक एम. के. बडोगे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *