Headlines

खामगाव:श्री गोरक्ष विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा




फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहन पाटील सोनवणे होते. तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम ढोल-ताशा, लेझीम पथक, स्काऊट-गाईड पथकासह भारत मातेची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी आणि महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत गावात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात श्री गोरक्ष नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या पिंपळकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर भारत स्काऊट गाईड पथकाने क्रीडा शिक्षक मयूर बोढारे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-पास्ट करत राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला. याप्रसंगी मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच् या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि घोषवाक्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी रस्सीखेच स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *