Headlines

जानोरी- पाडळी रस्त्याची चाळण:खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलन




इगतपुरी तालुक्यातील जानोरी-पाडळी रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव धांडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत अनोखे आंदोलन केले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता नेमका कुठे आणि खड्डा कुठे, हे समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका असून, चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनावेळी मंगेश भोर, त्र्यंबक कोकणे, सोमनाथ भोर, योगेश भोर, तेजस भोर, सचिन कोकणे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *