Headlines

महासंयोग:27 वर्षांनंतर पहिला श्रावणी सोमवार अन् नागपंचमी एकाच दिवशी‎; 16 ऑगस्ट 1999 नंतर पहिल्यांदाच जुळून आला दुर्मिळ मुहूर्त




यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत दुर्मिळ‎आणि शुभ पर्वाने होत असून, पहिल्याच श्रावणी‎सोमवारी नागपंचमीचा महासंयोग तब्बल २७‎वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट‎१९९९ रोजी असा योग आला होता. धर्मशास्त्रानुसार‎एकाच दिवशी शिवपूजन आणि नागपूजन करणे‎भाविकांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेष‎म्हणजे, याच दिवशी सकाळी ७ वाजून ५८‎मिनिटांनी सूर्य स्वतःच्या म्हणजेच //”सिंह’ राशीत‎प्रवेश करत आहे. या अनुकूल ग्रहमानामुळे‎शासनस्तरावर विद्यार्थ्यांच्या हिताचा एखादा मोठा,‎सकारात्मक निर्णय महिनाभरात घेतला जाण्याचा‎ज्योतिषीय अंदाज वर्तवला जात आहे.‎ नागपंचमीला बनवले जाणारे मुख्य नैवेद्य व पदार्थ‎ उकडीचे दिंडं : चणाडाळ आणि गूळ‎पुरणासारखे शिजवून, कणकेच्या पारीत‎ते सारण भरले जाते. त्याची घडी‎घातली जाते. हे दिंडं वाफेवर शिजवले‎जातात. नागपंचमीचा हा मुख्य नैवेद्य‎मानला जातो.‎ उकडीचे मोदक : ओले खोबरे आणि‎गुळाचे सारण भरून तांदळाच्या पिठाचे‎उकडीचे मोदक बनवले जातात.‎पातोळ्या : हळदीच्या पानांवर‎मोदकासारखेच गूळ-खोबऱ्याचे सारण‎भरले जाते. हा पदार्थ वाफेवर तयार‎केला जातो. हा पारंपरिक पदार्थ आहे.‎हळदीच्या पानांमुळे याला विशिष्ट‎सुगंध येतो.‎ गव्हाची / शेवयांची खीर : दूध, गूळ‎किंवा साखर, ओल्या खोबऱ्याचा वापर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करून पौष्टिक खीर केली जाते.‎ तांदळाच्या / ज्वारीच्या लाह्या :‎नागदेवतेला अर्पण करण्यासाठी आणि‎प्रसादासाठी ज्वारी किंवा तांदळाच्या‎लाह्यांचा वापर केला जातो. लाह्यांमध्ये‎दूध आणि गूळ मिसळून प्रसाद ग्रहण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केला जातो.‎ वरण-भात व पुरण : ज्या कुटुंबांत‎तळण वर्ज्य करून केवळ उकडण्याची‎परंपरा आहे, तिथे कुकरमध्ये किंवा‎पातेल्यात वाफेवर शिजवून नैवेद्य तयार‎केला जातो.‎ काय ‎टाळावे? तव्यावर पोळ्या,‎भाकऱ्या किंवा‎पराठे शेकू नयेत.‎कढईत भजी,‎पापड्या किंवा‎इतर कोणतेही‎पदार्थ तळू‎नयेत. भाजी‎चिरण्यासाठी‎सुरी, विळी‎किंवा कोयता‎वापरू नये.‎भाज्या हाताने‎मोडून‎शिजवण्याची‎परंपरा पाळावी.‎ सिंह संक्रांत : सूर्याचे‎स्वतःच्या राशीत (सिंह)‎आगमन होणे हे अधिकार,‎प्रशासन, शिक्षण क्षेत्रासाठी‎ऊर्जादायी मानले जाते.‎ द्विपुष्कर योग : शिवपूजन‎आणि नागपूजन एकाच‎दिवशी आल्याने पूजा आणि‎दानाचे फळ द्विगुणित होते.‎ उपवासाचे नियम :‎नागपंचमीला तळलेले पदार्थ‎खाणे किंवा तवा‎चुलीवर/गॅसवर ठेवणे वर्ज्य‎मानले जाते. त्यामुळे उपवास‎सोडताना उकडलेले पदार्थ‎(उदा. उकडीचे मोदक, दिंडं)‎खाण्याची परंपरा आहे. शिवशंकर, नागदेवतेचे एकत्र पूजन करा‎ ‎”या दिवशी शिवशंकर आणि नागदेवतेचे पूजन‎‎एकत्र करावे. दिवसभरात फळे किंवा फळांचा‎‎रस घ्यावा. सायंकाळी ५ वाजल्यानंतर,‎‎म्हणजेच प्रदोषकाळानंतर, कुलधर्म-कुलाचार‎‎करून नागपूजन व लघुरुद्राभिषेक करावा.‎शिवलीलामृत आणि शिवस्तुतीचे पठण करावे. उकडलेल्या‎पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. उपवास सोडावा. यामुळे दोन्ही व्रतांचे‎पुण्य लाभेल.’ ‎- रामकृष्ण बारहाते गुरुजी‎ श्रावणी सोमवारी नागाचे विशेष महत्त्व‎ ‎”समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष‎‎महादेवांनी प्राशन केले. ते विष कंठाखाली‎‎उतरू नये म्हणून त्यांनी गळ्यात नाग धारण‎‎केला. या पौराणिक घटनेचे प्रतीक म्हणून‎‎श्रावणी सोमवारी नागाचे विशेष महत्त्व असते.‎‎असाच दुर्मिळ योग १६ ऑगस्ट १९९९ रोजी‎आला होता. तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा हा शुभ योग जुळून आला‎आहे.’ – वेदमूर्ती ऋषिकेश चौधरी‎
(धर्म, समाज, संस्थेशी संबंधित‎बातमी पाठवण्यासाठी‎व्हॉट्सॲप क्रमांक 9340931215‎‎) (नोट‎ : या क्रमांकावर कॉल करता येणार नाही.)‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *