Headlines

श्रावणी सोमवार, नागपंचमीच्या दुहेरी योगामुळे औंढ्यात भाविकांची गर्दी:सकाळी आकरा वाजेपर्यंत 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन




देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी ता. १७ भाविकांची मोर्ठी गर्दी झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत तब्बल ४० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. संपूर्ण देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. भाविकांच्या रांगा कायम आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नागनाथ संस्थान प्रशासनाने आवश्‍यक त्या उपाय योजना केल्या आहेत. सोमवारी ता. १७ रात्री साडेबारा वाजता संस्थानचे पदसिध्द अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री दिड वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरम्यान, औंढा नागनाथ येथे रविवारी ता. १६ रात्री पासूनच भाविक दर्शनाच्या रांगेत उभे होते. संपूर्ण महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यातील भाविक देखील दर्शनासाठी आले आहेत. मंदिराच्या पश्‍चिमद्वारापासून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश देण्यात आला. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता अभिषेक पुजा बंद करण्यात आली तर विशेष पासही बंद करण्यात आले. त्यामुळे अभिषेक पुजेसाठी लागणारा वेळ व त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण दुर झाली. मात्र त्यानंतरही दर्शनासाठी सुमारे ४ तासाचा कालावधी लागत होता. सकाळपासून भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढू लागला आहे. दरम्यान, रांगेतील भाविकांसाठी संस्थानकडून पिण्याचे पाणी वाटप केले जात असून दानशूरांकडून साबुदाना खिचडीचे वाटपही केले जात आहे. मंदिरातील गर्दी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार, उपनिरीक्षक दिलीप मोरे, माधव जिव्हारे यांचे साध्या वेशातील पथके मंदिरा परिसरात तैनात करण्यात आले आहेत. हेही वाचा.. श्रावणी सोमवारचा उत्साह: त्र्यंबकेश्वर ते घृष्णेश्वर… महादेवाच्या मंदिरांत भाविकांची मांदियाळी; रात्रीपासूनच रांगा, आकर्षक फुलांच्या सजावटीचे पाहा खास व्हिडीओ पवित्र श्रावण महिना आणि त्यातच श्रावणी सोमवारचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवमंदिरे ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून गेली आहेत. राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासूनच सुरू असलेल्या महापूजेमुळे आणि गाभाऱ्यात केलेल्या मनमोहक सजावटीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *