![]()
कळमनुरी तालु्क्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात दोषींवर कारवाई होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कळमनुरी तालुक्यातील येगाव, पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर या शिवारामध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नुकसानीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्या ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित करून दिल्या होत्या. मात्र या याद्यांमध्ये ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्या नावे अनुदान देण्यात आले तर काही जणांना अत्यंत कमी अनुदान मिळाले. या संदर्भातील तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने चौकशी केली होती . या चौकशीमध्ये खरा प्रकार उघड झाला असून त्यानंतर कृषी सहाय्यक एस. एस. संगमवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील अन्य दोषींवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांवर झालेला अन्या दूर करावा तसेच प्रकरणातील अन्य दोषींवर कारवाई करावी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रविवारी ता. १५ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. यावेळी ज्ञानेश्वर जाधव, विलास जाधव, पंडीत जाधव, शुभम मुळे, गजानन कदम, भास्कर मुळे, संदीप जाधव, अरविंद जाधव, प्रभाकर मुळे, दिलीप जाधव, विजय जाधव, दुष्यंत जाधव, मारोती जाधव, विरभान जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी खरडणी अनुदान वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. यावरून पालकमंत्री झिरवाळ यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडून चौकशीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Source link
खरडणी अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी होणार:; पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश