Headlines

मनमाडचा पाणीपुरवठा‎आजपासून होणार सुरळीत‎:बुधवारपासून पुन्हा मिळणार तिसऱ्या दिवशी पाणी‎




करंजवण प्रकल्पातील विद्युत पुरवठ्यात झालेल्या बिघाडातील दुरूस्तीचे काम अद्यावत दुरूस्ती सामग्री व कुशल तंत्रज्ञांमार्फ त सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. मंगळवारी (दि.१८) हे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून मनमाड शहराला नियमित पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पालखेड योजनेद्वारे पाटोदा साठवणूक तलावातील पाणी सरळ मनमाड वागदर्डी जलशुध्दीकरण केंद्रात घेवून ते गावठाण विभागासह इतर भागात पुरविले जात आहे. त्यात पूर पाणी असल्याने शुध्दीकरण केल्यानंतर काही अंशी गढूळपणा राहत आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढील एक-दोन दिवस तरी हे पाणी गाळून, उकळून प्यावे. तसेच घरामध्ये असलेला पाणीसाठा जपून वापरावा. परिस्थिती दोन-तीन दिवसांत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा शहराला तिसऱ्या दिवशी नगरपालिकेतर्फे नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असेही मुख्याधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी सकाळपासून पालखेड योजनेतील पाणी वागदर्डी फिल्टर प्लँटद्वारा शहराला पुरविले जात आहे. ही फक्त पर्यायी व्यवस्था आहे. करंजवणचा विद्युत पुरवठा दुरुस्त झाल्यानंतर तेथील पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून मनमाडला नियमितपणे पुरविले जाईल, असे मनमाड पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *