![]()
श्रावणाच्या पवित्र पर्वात ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताकांची दिमाखदार मिरवणूक आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने बार्शीटाकळी नगरी दुमदुमली. शहराचे आराध्यदैवत व पंचक्रोशीत स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध श्री खोलेश्वर महाराज संस्थानात श्रावणातील
.
रविवारी रात्री गांधीग्राम येथील पूर्णा नदी, सिंदखेड मोरेश्वर येथील मोर्णा नदी तसेच चांदूर खडकी येथील विद्रुपा नदी व विविध नदी-संगमांतून पवित्र जल आणण्यासाठी निघालेल्या शिवभक्तांच्या कावड पालख्या सोमवारी पहाटे बार्शीटाकळीत दाखल झाल्या. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात दाखल झालेल्या पालख्यांचे सामाजिक व धार्मिक संघटनांतर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजता बायपास मार्गावरून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. बार्शीटाकळीसह कान्हेरी सरप व विझोरा येथील १० कावड पालखी मंडळांनी यात सहभाग घेतला. विविध मंडळांनी साकारलेल्या शिव व हनुमानाच्या मूर्ती, फुलांची आरास व भगव्या पताकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. मार्गावर भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजता पालख्या श्री खोलेश्वर महाराज मंदिरात पोहोचल्या. तेथे स्वयंभू शिवलिंगावर पवित्र जलाचा जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. उत्सवाचे नियोजन अध्यक्ष दिनेश रत्नपारखी व उपाध्यक्ष नानाभाऊ मांगुळकर यांच्या मार्गदर्शनात झाले. बार्शीटाकळी पोलिस ठाणे व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कावड यात्रेत विविध पालखी मंडळांचा सहभाग कावड यात्रेत अनेक पालखमी मंडळांनी सहभाग घेतला. यात श्री युवा शिवभक्त मंडळ (वंजारीपुरा), जय महाकाल मित्र मंडळ (वंजारीपुरा), शिव छत्रपती व्यायामशाळा (सोमवार पेठ), दत्तात्रय मठ (अण्णाभाऊ साठे नगर), माँ तुळजाभवानी मित्र मंडळ (गवारीपुरा), जय बजरंग मित्र मंडळ (माळीपुरा), कालभैरव मित्र मंडळ (संताजी नगर), आसरा माता मित्र मंडळ (भोईपुरा), शंभुनाथ मित्र मंडळ (गजानन नगर), शिवतांडव मित्र मंडळ (एकता नगर), छत्रपती ग्रुप (कान्हेरी सरप) व महाकालेश्वर मंडळ (सादिक नगर). या विविध पालखी मंडळांचा समावेश आहे.