Headlines

लासूर स्टेशनच्या युवकाने बनवली ‘मिनी थार’:लियाकत सय्यद यांनी ऑनलाइन पार्ट‌्स बोलावून केली घरीच जुळवणी‎




लासूर स्टेशन येथील लियाकत सय्यद या इलेक्ट्रॉनिक कारागिराने आपल्या कौशल्यातून अनेक भन्नाट प्रयोग साकारले आहेत. केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सय्यद यांनी गेल्या २५ वर्षांत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विविध उपकरणांवर काम करत आता हुबेहूब थारसारखी दिसणारी तीन दरवाजांची मिनी चारचाकी तयार केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील सय्यद यांनी सन २००० मध्ये लासूर स्टेशन येथील मुकुंद टीव्ही सेंटरमध्ये बाळू कदम यांच्याकडे टीव्ही रिपेअरिंग व इलेक्ट्रॉनिक कामाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल, ट्रॅक्टर तसेच इलेक्ट्रिशियनचे काम सुरू केले. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करत त्यांनी स्वतःच्या कल्पकतेला चालना दिली. २०१७ मध्ये त्यांनी बॅटरीवर चालणारी पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार केली. त्यानंतर पेट्रोल आणि चार्जिंग अशा दोन्ही पर्यायांवर चालणारी टू-इन-वन मोटरसायकल बनवली. २०२२ मध्ये चार्जिंगवर चालणारा मिनी ट्रॅक्टर तयार करून त्यांनी आणखी एक प्रयोग केला. याच मालिकेत २०२३ मध्ये त्यांनी ओपन थार तयार केली. त्यानंतर त्यात आवश्यक बदल करून २०२५ मध्ये तीन दरवाजांची, थारच्या धर्तीवर दिसणारी मिनी थार तयार केली. या युवकाचे कौतुक होत आहे. घरच्या वापरासाठी मी गाडी बनवली आहे. यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. मी स्वतः दोन वर्षापासून ती गाडी वापरतोय. एकदा चार्ज केल्यावर ती १३० किमीपर्यंत चालते. फक्त आरटीओ मान्यता नसल्याने आपण तिला विकू शकत नाही. लियाकत सय्यद यांनी सांगितले की गाडीची बॉडी मी स्वतः घरच्या घरी तयार करून घेतली आहे. बॅटरीचे कच्चे मटेरियल मागवून तेही घरच्या घरीच बनवले आहे. इतर मोटार व कंट्रोलरसह अल्टोचे टायर, इतर काही साहित्य ऑनलाइन मागवून घेतले. ते सामना जुळवून कार बनवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *