![]()
‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची पालखी सोमवारी भक्तिमय वातावरणात पार पडली. नागपंचमी यात्रेनिमित्त गेल्या २३ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ्
.
सकाळी शिवलीलामृत पारायणानंतर नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व अमितशेठ चिंतामणी तसेच गोवर्धन जोरे व मंगलाताई जोरे यांच्या हस्ते श्री नागेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजनसेवा केली. पालखीत नागेश्वराचा मुखवटा स्थापन केल्यानंतर जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली.
श्री नागेश्वर मंदिरापासून सुरू झालेली पालखी खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे वैतरणा नदी तीरावरून नव्या पालखी मार्गाने पुन्हा मंदिरात पोहोचली. मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढली होती, तर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
मुस्लिम पंच कमिटीकडून स्वागत श्री नागेश्वर पालखीचे मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे विणेकरी संतोष महाराज बारगजे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या वेळी कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, उपाध्यक्ष हाजी मंजुरअली सय्यद, सचिव आबेद खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.