Headlines

जुन्नर हादरले:पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ




जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (18 ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिवसभर तिचा सर्वत्र शोध घेतला. मुलगी सापडत नसल्याने शेवटी कुटुंबीयांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानेच तिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. त्याने चिमुकलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचारानंतर गळा दाबून निर्घृण हत्या तिने अत्याचाराची वाच्यता करू नये म्हणून नराधमाने मुलीच्या गळ्यावर गंभीर जखम करत तिचा गळा दाबून खून केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्यानेच अत्याचार करून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल व पुढील तपासातून पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. वरिष्ठ पोलिसांकडून आढावा; ‘फाशी’च्या शिक्षेची मागणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. विविध तपास यंत्रणांना या प्रकरणाच्या तपासासाठी कामाला लावले आहे. दरम्यान, जुन्नरच्या आमदारांच्याच गावात घडलेल्या या भयानक प्रकारामुळे पिंपळवंडी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला कोणत्याही परिस्थितीत फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घेतली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *