Headlines

Bhaskar Jadhav Slams Girish Mahajan Over Nashik Guardian Minister Post


राहुल नार्वेकर यांना आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत याचे भान राहिलेले नाही. अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो, त्यांची भूमिका पक्षविरहित असावी लागते. परंतु नार्वेकरांसारख्या व्यक्तीकडून अशा निष्पक्षतेची अपेक्षा करणेच चुकीचे आहे, असे शिवसेना उद्धव बाळासा

.

भास्कर जाधव म्हणाले की, नाशिकमध्ये कधीही इतके खड्डे पडले नव्हते जेवढे आता पडले आहेत, कुंभमेळ्याकरता नाशिकमध्ये 37 हजार कोटी रुपये येणार आहेत. ज्यामधील 15 हजार कोटी रुपये आले असून त्यातील 1 हजार 21 कामांची टेंडर काढली आहेत. 591 कोटी रुपयांचे टेंडर निघाले आहे, त्यात मोठा घोटाळा झाला, ते करणारे लोकं गिरीश महाजन यांचे नातेवाईक आहेत, त्यांनी मोठा घोटाळा केला म्हणून त्यांना प्रमोशन देत नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

खड्डे पाडण्यासाठी गोगावलेंना पालकमंत्रीपद

भास्कर जाधव म्हणाले की, भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद का मिळाले तर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष देणार आहेत. गोगावलेंना सुद्धा अधीक खड्डे पाडण्याकरता पालकमंत्रीपद दिले असावे.

मुख्यमंत्री तसे वागत नाहीत

भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांचे निर्णय बदलत नाहीत पण त्यांचे मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलतात. मुख्यमंत्र्यांनी सर्वांकडे समन्यायाने पाहिले पाहिजे. ते संपूर्ण राज्याचे पालक असतात मात्र तसे वागताना ते दिसून येत नाही.

देणगी चोरावर कारवाई व्हावी

भास्कर जाधव म्हणाले की, राम मंदिर व्हावे यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले असून मंदिर उभारणीसाठी अनेकांनी देणगी दिलेली आहे, काहींनी शारिरीक श्रम सुद्धा घेतले. मंदिर उभे राहिल्यावर आपले स्वप्न पूर्ण झाले अशी सर्व सामान्य माणसांची भावना होती. पण तिथल्या विश्वस्तांनी देणगीवर डल्ला मारला. मंदिराचे श्रेय घेणारे मंदिरातील चोरीवर काही बोलत नाही. ज्यांना देणगीवर डल्ला मारला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेच अशी सर्वांची इच्छा आहे.

रस्त्याच्या कामात बोगस कामे सुरू

भास्कर जाधव म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातीत इतर मतदारसंघातील रस्ते बघा आणि माझ्या मतदारसंघातील रस्ते बघा मी 10 वर्षांपूर्वी केलेले रस्ते आहेत ज्यांच्यावर एक खड्डा नाही पण गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये ज्यांच्या रस्त्यावर खड्डे झाले त्यांच्या मतदारसंघात रस्ता कुठे आणि खड्डा कुठे समजत नाही अशी परिस्थिती आहे असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या मतदारसंघात रस्ता शोधून सापडत नाही.

हे ही वृत्त वाचा जुन्नर हादरले:पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.