Headlines

बनावट आंतरराष्ट्रीय व्यवहारांतून करचुकवेगिरी:उदगीरमध्ये 1500 काेटींचा घाेटाळा; आयकर विभागाचा छापा, सीए ताब्यात




लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) अन्वेषण शाखेने एका बड्या सनदी लेखापालाच्या (सीए) कार्यालयासह निवासस्थाने व त्याच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक व छत्रपती संभाजीनगरच्या अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून आणखी दोन ते तीन दिवस हे सर्च ऑपरेशन चालणार आहे. छाप्याची माहिती अन‌् सीए गायब साठ जणांच्या पथकाने छापा टाकताच सीए गायब झाल्याचे दिसून आले. एक पथक कार्यालयात तर दुसरे घरी तळ ठोकून होते. २४ तास संशयित सीएचा शोध घेतल्यावर खबऱ्यांच्या नेटवर्कमधून त्याचा तपास लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *