![]()
वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मतिमंद व भोळसर आहे. तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना, गावातील तरुणांनी संधी साधून तिला दुचाकीवर बसवले आणि शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर मुलीचे वर्तन विचित्र वाटल्याने आधी तिला रुग्णालयात नेण्यात आले. घरी आल्यावर तिच्या कपड्यांवर चिखल साचल्याचे पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता, तिघा नराधमांनी 50 रुपये व बिस्किटाचे आमिष दाखवून शेतात नेल्याचे तिने सांगितले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी गावातीलच एका तरुणाने अशाच प्रकारे तिच्यावर जबरदस्ती केल्याची आपुलकीची कबुलीही मुलीने दिली. हट्टा पोलिसांची रातोरात धाड; 3 आरोपी अटकेत घडलेला भयानक प्रकार ऐकून सुन्न झालेल्या कुटुंबियांनी बुधवारी (19 ऑगस्ट) रात्री उशिरा हट्टा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय खाडे, लखन खाडे, प्रवीण खाडे आणि प्रकाश खाडे या चौघांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर आणि उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने रातोरात शोधमोहीम राबवून लखन, प्रवीण आणि प्रकाश या तिघांना ताब्यात घेतले. फरार आरोपी विजय खाडे याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. सर्व आरोपी 25 वर्ष वयोगटातील या घटनेमध्ये गुन्हा दाखल झालेले सर्वच आरोपी 20 ते 25 वर्ष वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या