![]()
हिंगोली शहरातील अष्टविनायक चौक रोड भागात चोरट्यांनी अवघ्या वीस मिनीटात कारची समोरील काच फोडून 3 लाखांची रोकड पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 19 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील अरुण टाले हे हिंगोली येथे खाजगी नोकरी करतात. त्यांनी मुथुुट फायनांन्स येथील गोल्ड लोन घेतले होते. सदर लोन फोडण्यासाठी त्यांनी मित्राकडून तीन लाख रुपये उधारीवर घेतले. त्यानंतर सदर रोकड घेऊन ते कारने हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी अष्टविनायक चौक मार्गावरील जैन मंदिराच्या समोर कार उभी केली होती. या कारमध्येच त्यांनी एका पिशवीत तीन लाख रुपयांची रोकड होती. दरम्यान, हिंगोलीत येण्यासाठी त्यांना उशीर झाल्यामुळे मुथुट फायनांन्सचे कार्यालय बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी कार तेथेच उभी ठेऊन ते ज्या कार्यालयात काम करतात त्या ठिकाणी केले होते.
दरम्यान, त्यांच्या कार्यालयातील काम आटोपून ते वीस मिनीटातच परत आले. यावेळी त्यांना कारची चालकाच्या साईडची काच फुटलेली दिसली तसेच त्याठिकाणी ठेवलेली रोकडही गायब झालेली दिसून आले. चोरट्यांनी रोकड पळविल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, उपनिरीक्षक साखरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, दिलीप लेकुळे, शेख मोहसीन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात चोरटे दिसून आले.
त्यानुसार आता पोलिसांनी शहरातील आणखी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल झाला असून चार चोरट्यांनी पाळत ठेऊन हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले आहे.