![]()
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे १ मे रोजी चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गाव परिसरात एका साडेनऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार
.
खुनानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या ओढ्याजवळ टाकून दिला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलीसोबत दिसल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात पीडित मुलगी कुटुंबासोबत राहत होती. ती गावातीलच शाळेत इयत्ता चौथीत शिकत होती. शेतीकाम करणारा नराधम तरुणही त्याच परिसरात राहतो. १८ ऑगस्ट रोजी तब्येत ठीक नसल्याने दुपारी मुलगी घरी एकटीच होती. त्याचा फायदा त्याने घेतला.
साडेसात तासांनंतर घटना उघडकीस
मुलगी दुपारी एक वाजेच्या सुमारास बेपत्ता असल्याचे पालकांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरदेखील ती सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी सायंकाळी पाच वाजता पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात धाव घेत शोध घेतला तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास या मुलीचा मृतदेह आढळून आला. बुधवारी मुलीचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष विनंती करेन की, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल.
मुलगी दुपारी एक वाजेच्या सुमारास बेपत्ता असल्याचे पालकांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरदेखील ती सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी सायंकाळी पाच वाजता पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात धाव घेत शोध घेतला तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास या मुलीचा मृतदेह आढळून आला. बुधवारी मुलीचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपी मुलीच्या ओळखीचा
मुलीचे आणि आरोपीचे कुटुंब एकमेकांना ओळखते. पीडित मुलगीही नराधमाला ओळखत होती. तो मुलीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी अनेकदा येत होता. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून ती पेरू खायला ती त्याच्यासोबत गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
१५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल होणार
सरापूर प्रकरणात पोलिसांनी १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील तपासदेखील तितक्याच जलदगतीने पुढील १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.
पोलिसांचे पथक एका गावकऱ्याकडील सीसीटीव्ही फुटेज पाहताना नराधम गावकऱ्यांसोबत साळसूदपणे ते पाहत होता. फुटेजमध्ये तो मुलीसोबत जाताना दिसला. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्य कबूल केला.