Headlines

खुलताबादमार्गे जड वाहनांच्या वाहतुकीत बदल:उरुसानिमित्त पोलिस प्रशासनाचा निर्णय, 56 सीसीटीव्ही, कॅमेरा व्हॅन, 400 पोलिसांचा ताफा तैनात‎



येथे हजरत जर जरी जर बक्ष यांच्या ७४० व्या उरुसानिमित्त २० ते ३० ऑगस्ट या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड वाहनांच्या मार्गात बदल केला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दि

.

उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता फर्च मोहल्ला येथून रूट मार्च काढण्यात आला. या मार्चद्वारे संवेदनशील ठिकाणे, वाहतूक व गर्दीच्या नियमावलीची पाहणी करण्यात आली. उरूस कालावधीत २० अधिकारी, १२५ पोलिस अंमलदार, २५० होमगार्ड, १ बॉम्बशोधक पथक आणि १ आरसीपी पथक तैनात राहणार असून, शहरावर ५६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह आधुनिक ‘सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन’द्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.

वाहतूक मार्गात असा राहणार बदल : संभाजीनगर ते कन्नड मार्गे खुलताबादहून जाणारी वाहने शरणापूर टी-पॉइंट, माळीवाडा, कसाबखेडा फाटा वेरूळमार्गे वाहतूक वळवली आहे. कन्नड ते संभाजीनगर मार्गे खुलताबादहून जाणारी वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, माळीवाडा शरणापूरमार्गे, तर वेरूळ ते फुलंब्री मार्गे खुलताबादहून जाणारी वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, शरणापूर, संभाजीनगरमार्गे जातील. फुलंब्री ते वेरूळ मार्गे खुलताबादहून जाणारी वाहने फुलंब्री, संभाजीनगर, शरणापूर, कसाबखेडा फाटामार्गे पुढे जातील. उरूस काळात शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी सहकार्य करून निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *