Headlines

बार्शी तालुक्यामध्ये खरीपातील पेरणी सरासरीपेक्षा 19.55 टक्क्यांनी अधिक:87 हजार 484 हेक्टरवर पेरणी पूर्ण; सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎



अवर्षणग्रस्त आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला रब्बीचा तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात अलीकडच्या काळात खरीप पिकांचे क्षेत्र वाढत आहे. मोठी नदी किंवा सिंचन प्रकल्पांची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवल

.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पिकनिहाय साप्ताहिक पेरणी अहवालानुसार, बार्शी तालुक्यात आतापर्यंत एकूण ८७ हजार ४८४.४५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. तालुक्याचे खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ७३ हजार १७७.१० हेक्टर असून, त्याच्या तुलनेत यंदा पेरणीची टक्केवारी ११९.५५ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५६ हजार ४७२ हेक्टर असताना प्रत्यक्षात तब्बल ८२ हजार ८७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सरासरीच्या १४६.७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. सोयाबीनच्या मोठ्या क्षेत्रामुळे तालुक्यातील तेलबिया पिकांच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. तेलबियांचे सरासरी क्षेत्र ५६ हजार ५९४.५० हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी ८२ हजार८८६.४० हेक्टरवर ज्या ठिकाणी पावसाचा खंड आहे. त्या ठिकाणी कोळपणी व आंतरमशागत करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा. तसेच १३.०४५ सारख्या बाष्परोधकाचा ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उपलब्ध असलेल्या ठिकाणी संरक्षित सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन साधनांचा वापर करावा. त्यामुळे पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध करून पिके तग धरू शकतील. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात. – संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने सोयाबीन नंतर उडीद तूर मूग व मका ही पिके घेण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल असल्याचे पेरणीवरून दिसत आहे. तालुक्यात अलीकडच्या काळात तुरीचे क्षेत्र कमी होऊन नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.मक्याची पेरणीही सरासरीपेक्षा कमी तृणधान्यांच्या पिकांमध्ये मक्याची पेरणी २३० हेक्टरवर झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ३६०.४० हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरणी सरासरीच्या ६०.५६ टक्के झाली आहे. तृणधान्यांची पेरणी २३० हेक्टरवरच झाली आहे. झाली आहे. त्यामुळे तेलबियांची पेरणी १४६.४६ टक्के झाली आहे. खरीप पिकांच्या एकूण क्षेत्रात वाढ झाली असली, तरी कडधान्यांच्या पेरणीत अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. उडदाची १ हजार ३४७.५५ हेक्टर, तुरीची २ हजार ९०१.४० हेक्टर, तर मुगाची ११९.१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांचे एकूण सरासरी क्षेत्र १६ हजार २०२.८० हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी ४ हजार ३६८.०५ हेक्टरवर झाली आहे.

सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा जास्त कल

‘कृषी’च्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *