![]()
अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महाविद्यालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाविद्यालय परिसरात धरणे आंदोलन केले. गायत्री अवताडे (रा. नेवासा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयात आपत्कालीन उपचारासाठी व ऑक्सिजन व्यवस्था नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी यावेळी केला. गायत्रीच्या मृत्यूस महाविद्यालयातील अपुर्या वैद्यकीय सुविधांचा अभाव कारणीभूत आहेत. महाविद्यालयात ऑक्सिजनची पुरेशी सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र, महाविद्यालयातील वैद्यकीय सुविधा अपुर्या असल्याने परिस्थिती गंभीर झाली. तिला तत्काळ उपचार मिळाले नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थिनीच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित करावे व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत करणार ^ आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे महाविद्यालयात उपलब्ध होती. गायत्री अवताडे हिला वेळेत उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये जिल्हा रूग्णालय व पोलिस प्रशासनातील अधिकारी सहभागी असतील. त्यांनी दिलेला निर्णय महाविद्यालय प्रशासनाला मान्य राहील.- प्राचार्य डॉ. सुनील पवार
Source link
होमिओपॅथिक कॉलेजमध्ये विद्यार्थिनीला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचा आरोप