Headlines

आयटी पार्कमागील रस्त्यावर दुचाकीलाकारची धडक; 2 भाऊ जागीच मृत्युमुखी:कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले; कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल



कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या २ सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला धड

.

निखिल आणि कपिल हे दोघेही भाऊ सिडकोतील प्रोझोन मॉलमधील चायनीज ओक आणि चटोरी रेस्टॉरंटमध्ये कामाला होते. बुधवारी कपिलची ड्युटी रात्री ९ वाजता संपल्याने तो घरी आला. जेवण करून मध्यरात्री तो मोठा भाऊ निखिलला आणण्यासाठी दुचाकीवरून (एमएच २० एचजे ३८२३) गेला होता. त्याला घेऊन घरी परतत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या कारने (एमएच २८ बीएस ०९९०) त्यांना उडवले.यात दोघेही जागीच ठार झाले.

चालक अद्याप पसार; कारच्या नंबरवरून पोलिसांचा शोध सुरू

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक (प्रभारी अधिकारी) गणपत सत्वजी राहिरे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक काळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणांचे मामा फकिरा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फॉर्च्युनर (एमएच-२८-बीएस-०९९०) चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक अद्याप पसार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास सर्जेराव लहाने हे करत आहेत.

अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे तुकडे बोनेटमध्ये घुसले

सिल्लोड तालुक्यात मिस्त्रीकाम करून अंकुश आरके आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना कपिल, निखिलसह एक लहान मुलगी आहे. मुले मोठी झाल्याने त्यांनी चांगल्या कामाला लागावे, या हेतूने दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी दोन्ही मुलांना शहरात मामा फकिरा गोविंदा पवार (३४) यांच्याकडे पाठवले होते. दादाला घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला कपिल रात्री १ वाजला तरी परतला नाही. घरापासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी एवढा वेळ लागत असल्याने मामा फकिरा यांनी कपिलला फोन केला. सुरुवातीला कॉल कुणी उचलला नाही. काही वेळाने फोन उचलला गेला, मात्र पलीकडून पोलिसांनी थेट अपघाताची माहिती दिली. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेमुळे आरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर होऊन तिचे पार्ट‌्स कारच्या बोनेटमध्ये अडकले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबली होती. अपघातानंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पहाटे २:२७ वाजता त्यांना मृत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *