![]()
राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत 604 चालकांना पहील्याच दिवशी नोटीस मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशात आजपर्यंत 3,995 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 604 चालकांना व्यवहार्य मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले. या चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात इतर भागांमध्ये पण कारवाई दरम्यान, राज्यातील इतर भागांत आतापर्यंत 4,222 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 664 चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 8,217 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून,1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगाची मुभा नाही- प्रताप सरनाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासनाकडून संबंधित चालकांबाबत सहानुभूतीची भूमिका घेतली जात असून, त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषेच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेली तपासणी मोहीम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या मुदतीनंतरही एखादा चालक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला. पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून वेळ दिला जात असला, तरी नियमांचे पालन करण्यापासून कोणालाही सूट मिळणार नाही. निर्धारित नियम टाळण्याची किंवा त्यातून सुटका करून घेण्याची संधी दिली जाणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
Source link
मराठी न येणाऱ्या 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस:परिवहन विभागाची मोठी कारवाई; भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगाची मुभा नाही