![]()
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) समृद्धी महामार्गावर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते ठाणे या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एक एसटी बस सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटीने हा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या विविध मार्गांचा वापर करावा लागतो. समृद्धी महामार्गामुळे हा प्रवास अधिक वेगवान होणार असून, एसटी बससेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. प्रायोगिक बससेवेला मिळणारा प्रतिसाद, प्रवासी संख्या आणि उत्पन्नाचा आढावा घेतल्यानंतर या मार्गावर बसफेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बससेवा सुरू करण्यापूर्वी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बसचे भाडे आणि थांबे निश्चित केले जाणार आहेत. दिवाळीच्या कालावधीत ही सेवा सुरू करण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. एसटीचे तिकीट नव्याने ठरणार! रस्त्यांची पुन्हा मोजणी सुरू एसटी बसचे तिकीट ३० वर्षांपूर्वीच्या अंतरावर आधारित आहे. मात्र, रस्ते रुंदीकरण, नवीन मार्ग आणि वळणांमधील बदलांमुळे गावांमधील प्रत्यक्ष अंतर बदलले आहे. ही तफावत दूर करण्यासाठी एसटी महामंडळाकडून राज्य व राष्ट्रीय महामार्गांची नव्याने मोजणी केली जाणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागावर ‘धुळे-सोलापूर’ महामार्गाची जबाबदारी सोपवली आहे. या मोहिमेनंतर प्रवासाच्या नव्या अंतरानुसार बसच्या तिकीट दरात बदल होण्याची शक्यता आहे. प्रतिसादावर बसफेऱ्या वाढवण्याचा निर्णय समृद्धी महामार्गावर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली बस दिवाळीत सुरू करू. या बसचे भाडे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. प्रतिसाद मिळाल्यानंतर फेऱ्या वाढवण्यात येतील. -प्रमोद नेहूल, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ.
Source link
दिवाळी सणात समृद्धी महामार्गावरून संभाजीनगर ते ठाणे धावणार एसटी:भाडेही लवकरच निश्चित होणार, प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करणार