![]()
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आपल्या तारुण्यातील एक रंजक आणि मजेशीर किस्सा सांगितला. वयाच्या विसाव्या वर्षी पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले असताना, पत्नी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ती आपली पत्नी असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून आपल्याला चक्क तुरुंगात जावे लागले असल्याचा एक किस्सा बावनकुळे यांनी यावेळी सांगितली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी 20 वर्षांचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा माझी पत्नी अल्पवयीन होती. चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडले. माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिने सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकले, असा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला. तसेच तब्बल दीड वर्ष ही केस सुरू होती आणि मी 8 दिवस जेलमध्ये असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे प्रेम जुळले तेव्हा पत्नी 16 वर्षांची होती आणि मी 20 वर्षांचा होतो. आम्ही दोघेही अल्पवयीन होतो. त्यावेळी आम्ही कयामत से कयामत चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडले. आम्ही दोघेही छोटे होतो. पण आम्हाला कोणालाच काही सांगता येत नव्हते. काही कारण नसताना पोलिस मला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून माझ्यावर केस लावली, असे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
Source link
मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा, 8 दिवस कोठडी…:चित्रपट पाहायला गेलो अन् थेट जेलमध्ये पोहोचलो; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला रंजक किस्सा