![]()
रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन सख्ख्या मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच पीडित मुलींच्या आईने आपल्या पतीविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बाळाराम जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याने ऑक्टोबर 2024 ते जून 2026 या कालावधीत आपल्या 11 आणि 14 वर्षांच्या मुलींवर पाभरा (ता. म्हसळा), तळा, माणगाव आणि सातारा या वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले. या अत्यंत गंभीर प्रकरणी माणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉस्को कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या संदर्भातील या देखील बातम्या वाचा जुन्नर हादरले:चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. इथे सविस्तर वाचा ‘बघा बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’:चिमुरडीवर अत्याचार करून गावकऱ्यांसोबतच शोध घेत बसला, एका वाक्याने नराधमाचे फुटले बिंग पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हे पाशवी कृत्य केल्यानंतर आरोपी गावकऱ्यांमध्ये मिसळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहताना त्याने मारलेली ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीत दिसतोय’ ही अतिशहाणपणाची बढाईच त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाच्या मुसक्या आवळल्या गेल्या. इथे सविस्तर वाचा
Source link
रायगडमध्ये संतापजनक प्रकार!:जन्मदात्या बापाकडूनच पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार, आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल