![]()
महाराष्ट्राला एल निनोचा परिणाम जाणवणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील धरणांत ऑगस्टपासून पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये ६.१४% पाणी कमी आहे. विशेष म्हणजे १ जून रोजी गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये ४.२८ टक्के पाणी कमी होते. पावसाळा पुढे सरकताना यंदाच्या व गेल्या वर्षीच्या जलसाठ्यात फरकही वाढत आहे. सध्या राज्यातील ३०३२ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांत ३०३९७.२४ दशलक्ष घनमीटर (७४.४८ %) उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी हा साठा ८०.६२ % टक्के होता. आता ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यास शेती आणि उद्योग क्षेत्र संकटात सापडू शकते. महाराष्ट्रात यंदा जूनमध्ये राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ६०.६ टक्के पाऊस पडला. जुलैमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातच पाऊस झाला. धरणांचा तुलनात्मक साठा तारीख यंदाचा साठागेल्या वर्षी साठा
१ जून २७.७९ % ३०.०४ %
१५ जून २४.५३ % ३०.७८ %
१ जुलै २३.६३ % ४५.७६ %
१५ जुलै ४४.३८ % ६०.०९ %
१ ऑगस्ट ६६.७९ % ७०.९२ %
१५ ऑगस्ट ७२.९४ % ७४.०२ % गेल्या वर्षी मे महिन्यातील पावसाने लाभ महाराष्ट्रात गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात १८ दिवस पाऊस पडला. राज्यात मे महिन्यात सरासरी १७.७ मिलिमीटर पाऊस पडतो. २०२५ मध्ये प्रत्यक्षात १८६.६ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाळ्यातही पावसाचे प्रमाण तुलनेत जास्त होते. त्यामुळे राज्यातील धरणे लवकर भरली होती. आणि सिंचनाला लाभ झाला. या वर्षी मात्र जून महिन्यातील जलसाठा जुलै महिन्यात आणखी घटला. जुलैच्या उत्तरार्धात पावसाने जोर घेतल्यानंतर धरणांतील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा
विभाग प्रकल्पांची आजचा गेल्या वर्षीचा संख्या साठा साठा
नागपूर ३८७ ६०.४० % ७०.६८ %
अमरावती २७७ ६२.१९ % ७५.२३ %
संभाजीनगर ९२९ ५०.१३ % ७३.२१ %
नाशिक ५३९ ७८.७६ % ७२.९२ %
पुणे ७२६ ८८.३३ % ८९.२२ %
कोकण १७४ ८९.७० % ९०.७५ %
महाराष्ट्र ३०३२ ७४.४८ % ८०.६२ %
(स्त्रोत : जलसंपदा विभाग, २२ ऑगस्ट रोजी असलेला साठा) राज्यात एल निनोचा परिणाम जाणवणे सुरू
महाराष्ट्रातील पावसाची सद्य:स्थिती
विभाग आतापर्यंत प्रत्यक्षातील टक्के गेल्या वर्षीचा टक्के अपेक्षित पाऊस पाऊस पाऊस
कोकण २२७०.२ २३२०.९ १०२.२ २१२१.५ ९३.४
नाशिक ४९८.३ ४०६.८ ८१.६ ३७३.६ ७५
पुणे ७०१.४ ५६५.१ ५२.७ ५७७.१ ८२.३
संभाजीनगर ४५७.४ ३६६ ८० ४७७.७ १०४.४
अमरावती ५५१.६ ४४६.५ ८०.९ ५७२.२ १०३.७
नागपूर ७९६.२ ५७० ७२.३ ८२४.२ १०३.५
महाराष्ट्र ७४१.५ ६७०.५ ९०.४ ७१८.५ ९६.९
(पाऊस मिलिमीटरमध्ये, २२ ऑगस्टपर्यंतच्या नोंदी, स्रोत : महाराष्ट्र सरकारची वेबसाइट)
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धरणांत 74% पाणी साठा, सप्टेंबर कोरडा गेल्यास शेती, उद्योग संकटात