Headlines

आमदारांनी जाणून घेतल्या अडचणी:आमदार पाटील यांनी केला आलेगाव येथे मुक्काम‎




शेतकऱ्यांचे शेतीविषयक प्रश्न, वीजपुरवठ्याच्या अडचणी, शेतजमिनीच्या बांधांचे वाद, रस्ते, रेशन धान्य, पाणीपुरवठा, गावातील मूलभूत सुविधा, शाळा, घरकुल, आरोग्य सेवा व विविध शासकीय दाखले यांसह नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. ‘आमदार मुक्कामी, आपल्या गावी’ या नावीन्यपूर्ण अभियानाचा प्रारंभ माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द या गावातून झाला. आमदारांसह प्रशासनही गावात आल्याने या उपक्रमाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या. आमदार अभिजित पाटील यांनी ही अभियान सुरू केले. गावातील नागरिकांना आपल्या अडचणींसाठी वारंवार तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालय, महावितरण किंवा अन्य शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना थेट गावात आणण्याचा निर्णय या अभियानांतर्गत घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘अधिकारी गावात आणि प्रश्न आमदारांसमोर’ अशी या अभियानाची कार्यपद्धती राहणार आहे. आलेगाव खुर्द येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास तहसीलदार संजय भोसले, पोलिस प्रशासनातील बाळासाहेब भरणे, गटविकास अधिकारी महेश सुळ यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तसेच गावपातळीवरील समस्या मांडल्या. अधिकारी समोरच असल्याने अनेक प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *