Headlines

संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी:गौरव ग्रंथ प्रकाशन, सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही सोहळा




पुणे येथे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात नहार यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही उत्सव साजरा केला जाईल. संजय नहार गौरव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय नहार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे बुक फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित राहतील. या सोहळ्यासाठी जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीर येथील डीपीएस स्कूलचे अध्यक्ष विजय धर, मणिपूरमधील राज्यसभा खासदार प्रमोद बोडो, जम्मू-काश्मीरचे माजी वित्तमंत्री हसीब द्राबू, ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुल्लत, लडाख येथील खासदार मोहम्मद हनीफा जान, जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ उद्योजक मुश्ताक छाया आणि ग्रेटर काश्मीरचे मुख्य संपादक फैय्याज कल्लु यांचा समावेश आहे. ही माहिती गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया आणि कार्याध्यक्ष शैलेश वाडेकर यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *