![]()
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे दि. १ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वच्छता अभियान महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीबाबत जनजागृती केली. या अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता तसेच चांदवड शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यासोबतच वृक्षारोपण अभियान घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. सामाजिक व राष्ट्रीय जाणीव निर्माण करण्यासाठी स्वच्छता प्रतिज्ञा, नशामुक्त भारत प्रतिज्ञा, डिजिटल अवेअरनेस अभियान आणि विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात ‘स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रविकास’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक व संदेशपूर्ण पोस्टर्स सादर केले. ‘वंदे मातरम’ आणि ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दल आदराची भावना जागृत करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर संदेश समाजापर्यंत पोहोचविला. या अभियानाला महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनील बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ. आकाश जैन, पंकज चोपडा आणि विवेक जैन यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अजय दहाड यांनी ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्या डॉ. संगीता दोशी, विद्यार्थी कल्याण विभागाच्या डॉ. जयश्री वानखडे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
‘स्वच्छ परिसर अन् निरोगी समाज’चा संदेश:चांदवड येथील होमिओपॅथिक महाविद्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन