![]()
नगर शहरामध्ये आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामने अटीतटीचे झाले. काही सामन्यांचा निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लांबला तर दोन अंतिम सामने टायब्रेकरपर्यंत रंगले. अखेर १६ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल १२ वर्षांखालील मुलां
.
विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघांना फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया आणि शिवाजियन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते चषक देण्यात आले. खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यांमध्ये १६ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. प्रवरा पब्लिक स्कूलकडून हेमा गावित हिने सातव्या मिनिटाला गोल करून खाते उघडले. त्यानंतर मयुरी कोल्हे हिने नवव्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळ करत आर्मी पब्लिक स्कूलला एकही गोल करू दिला नाही. अखेर २-० गोलने प्रवरा पब्लिक स्कूलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल विरुद्ध सेंट मायकल्स स्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात २-० गोलने सेंट मायकल्स स्कूलने विजय मिळवला. सेंट मायकल्सकडून २७ व्या मिनिटाला सारांश बोरा व ३१ व्या मिनिटाला नाविल दिवानी यांनी गोल करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट मायकल्स स्कूल असा अंतिम सामना रंगतदार झाला. सेंट मायकल्सकडून अनिस झांजे याने ३५ व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर प्रवरा स्कूलकडून ३९ व्या मिनिटाला मोहित चौधरी याने गोल करून बरोबरी साधली. सामन्याच्या शेवटपर्यंत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत राहिल्याने सामना टायब्रेकरवर घेण्यात आला. टायब्रेकरमध्ये ३-२ गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल असा अत्यंत अटीतटीचा सामना प्रेक्षकांना अनुभवता आला. आर्मी स्कूलकडून आदर्श द्विवेदी याने ३० व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. मात्र सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात सेक्रेड हार्टकडून जोएल साठे याने गोल करून बरोबरी साधली. शेवटपर्यंत १-१ गोलची बरोबरी राहिल्याने हा सामना टायब्रेकरवर घेण्यात आला. टायब्रेकरवरसुद्धा ३-३ गोलने बरोबरी साधली गेली. त्यानंतर सडन डेथवर सामना घेण्यात आला. पुन्हा तीनदा संधी बरोबरीत गेल्यानंतर अखेर ३-२ गोलने सेक्रेड हार्ट स्कूलने विजय मिळवला.
स्पर्धेत खेळाूंना मिळाली पारितोषिके वैयक्तिक पारितोषिकांमध्ये १२ वर्षांखालील गट : नाविल दिवानी, प्रिन्स चंदन, सैराज तागड, अरव बजाज, कृषिव केशी. १४ वर्षांखालील गट : शौर्य चंगेडिया, अजय सांगळे, रुद्र भोये, आदर्श साबळे. १६ वर्षांखालील गट : लक्ष्य चौहान, अंशुमान विधाते, रामचंद्र पालवे, ओम लोखंडे, अशोक चांद, अफान शेख. १६ वर्षांखालील मुलींचा गट : हृदया तडके, प्रांजल काकडे, हेमा गावित, काव्या झावरे या खेळाडूंनी पारतोषिके मिळवली.