![]()
तालुक्यातील विटावा-एकलहेरा रस्त्यावर वाळूने भरलेल्या विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकने शाळेतून पायी घरी जाणाऱ्या दोन बहिणींना चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आठवर्षीय चिमुकली जागीच ठार झाली, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. आरुषी कृष्णा तिवारी (८) असे मृत तर नंदिनी तिवारी (१६) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरुषी कृष्णा तिवारी ही ग्लोबल किड्स इंग्लिश स्कूलमध्ये अपर केजीमध्ये शिकत होती. मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शाळेच्या बसने तिला सोडल्यानंतर ती तिची मोठी बहीण नंदिनी हिच्यासोबत घराकडे पायी जात होती. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव विनाक्रमांक हायवाने दोन्ही बहिणींना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, आरुषीचा टायरखाली आल्याने जागीच अंत झाला, तर गंभीर जखमी नंदिनीवर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नागरिकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हायवा चालकाला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मयत आरुषीचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेश येथील असून, ते स्थानिक एमआयडीसीतील एका उद्योगात कामाला आहे. ऐन लहान वयात चिमुकलीचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी नंदिनीवर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
Source link
वाळूने भरलेल्या हायवाने दोन शालेय विद्यार्थिनींना चिरडले:एक जागीच ठार, गंभीर जखमी नंदिनीवर संभाजीनगरला उपचार