![]()
सधन कुटुंबातील पालक आपल्या मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठी फी भरतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे मोठी फी भरणे शक्य नसलेल्या कुटुंबांतील मुले-मुली नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेच्या शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. विधानपरिषदनिवडणुकीतील यावेळी आमदार राऊत म्हणाले की, नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू करण्यास मान्यता आणली आहे. नगरपालिकेमार्फत चालवली जाणारी राज्यातील ही पहिली सीबीएसई पॅटर्नची शाळा असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळेत प्रवेश सुरू होणार आहेत. विजयाबद्दल मराठा एकता मंडळाच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांची सपत्नीक वह्यांची तुला करण्यात आली. या तुलाद्वारे जमा झालेल्या सुमारे १२०० वह्या बार्शी नगरपालिकेच्या २० शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. राऊत चाळ परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर न.पा. शाळा क्रमांक ३ येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राऊत बोलत होते. कार्यक्रमास बार्शी नगरपालिका भाजपचे गटनेते विजय चव्हाण, बांधकाम सभापती दीपक राऊत, संदेश काकडे, मीरा नाळे, हेमंत जाधव, राजीव राऊत, शाळेचे मुख्याध्यापक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. संतोष सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माधुरी गोरे, प्रियंका सुरवसे, श्रद्धा सुरवसे व विद्यार्थी उपस्थित होते.
Source link
उपक्रम:गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व पालिका शाळांना सुविधा पुरविणार- आमदार राऊत