![]()
खुलताबादच्या जर जरी जर बक्ष उरुसाला जाणाऱ्या जालन्यातील दोघा मित्रांचा संभाजीनगरात अपघाती मृत्यू झाला. क्रांती चौक उड्डाणपुलावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तेते कोणत्याही वाहनाने त्यांना उडवले नाही तर ते स्वत:च पडले असल्याचे माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोहिलावर यांनी दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण बाजूला फेकला गेल्याने बचावला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. परवेज अफसर शेख (१७) आणि समीर शागीर शहा (२०) अशी मृतांची नावे आहेत, तर अर्शद मजार शहा (१७,) हा जखमी आहे. तिघेही जालना येथील रहिवासी आहेत. खुलताबाद उरुसासाठी जालना येथील शास्त्री मोहल्ला भागातील ६ ते ७ मित्र ३ ते ४ दुचाकींवरून निघाले होते. परवेज, समीर आणि अर्शद हे तिघे एकाच दुचाकीवर होते. क्रांती चौक उड्डाणपूल उतरताना चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी घसरून तिघेही रस्त्यावर पडले. यामध्ये अर्शद दूर दिशेला फेकला गेल्याने बचावला. अपघातानंतर सोबतच्या मित्रांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या परवेज आणि समीरला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कुटुंबाचा एकमेव आधार हिरावल्याने शोककळा परवेजचे वडील दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी १७ वर्षांच्या परवेजवर होती. तो मजुरी करता होता. तीन बहिणींत तो एकुलता एक भाऊ होता. समीरचे वडील हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.
Source link
ईद-ए-मिलादच्या आनंदावर शोककळा:उरुसासाठी खुलताबादला जाणाऱ्या जालनायेथील दोघांचा संभाजीनगरात अपघाती मृत्यू