Headlines

पैठणला मोसंबीचे भाव 35 वरून 15 हजारांवर:दिल्लीच्या बाजारपेठेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामधून मोठी आवक‎




पैठण तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडले आहेत. पावसाने दडी मारल्याने आंबे बहारातील मोसंबीची फळगळ होत असतानाच, दुसरीकडे बाजारभावात घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ३५ ते ४० हजार रुपये प्रतिटन मिळणाऱ्या मोसंबीला आता १० ते १५ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. त्यातच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून दिल्लीच्या बाजारपेठेत मोसंबीची आवक होत असल्याने पैठण-पाचोडच्या मोसंबीसमोर बाजारपेठीय स्पर्धा आहे. पैठणची मोसंबी पूर्वी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मात्र, सध्या आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातून दररोज मोठ्या प्रमाणात मोसंबी उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. पुरवठा वाढल्याने मागणीच्या तुलनेत बाजारात माल पडून राहत आहे, ज्याचा परिणाम मोसंबीच्या दरावर झाला आहे. बागेची नियमित पाहणी करून आवश्यक फवारण्या कराव्यात, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी किशोर तांगडे, दीपक मोरे आणि किशोर दसपुते यांनी केली आहे. परराज्यातील मोसंबीच्या आवकेचा उत्पादकांना फटका बसला आहे. आवक नियंत्रित झाल्यानंतरच दिलासा मिळेल, असे व्यापारी इरफान बागवान यांनी सांगितले. बाजारात आवक होत असल्याने भाव घसरले आहेत. आवक घटल्यानंतर भावात सुधारणा शक्य असल्याचे बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी सांगितले. पावसाने दडी मारल्याने आंबे बहारातील मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात व्यापारीही शेतकऱ्यांकडून हीच संधी साधून कमी दराने मोसंबीची मागणी करीत आहेत. पुढील महिन्यात सण, उत्सव असून, इतर राज्यातून होणारी मोसंबीची आव कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मराठवाड्यातील मोसंबीला मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत सुरू असलेली फळगळ रोखण्याचे आव्हान आहे. पुढील महिन्यात सण-उत्सव काळात दर वाढण्याची शक्यता



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *