Headlines

केळगाव येथे रेशन कार्ड संदर्भात शिबिर उत्साहात:तालुका पुरवठा विभागाकडून लाभार्थींना मार्गदर्शन‎




संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तथा चेअरमन विजय पवार यांच्या प्रयत्नातून केळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी सकाळी ११ वाजता रेशन कार्ड संदर्भातील विविध समस्यांवर मार्गदर्शन व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विशेष कॅम्प घेण्यात आला. संभाजी ब्रिगेडने केलेल्या निवेदनाची दखल घेत अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी त्यांना शाळेपर्यंत पोहोचविले. त्यानंतर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्जेराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार तथा पुरवठा विभागाचे बळीराम मुडे, पुरवठा विभागाचे आशिष औटी, पेशंकर, ग्राम महसूल अधिकारी निलेश देशमुख, महसूल सेवक विठ्ठल राठोड, कदम, आनंदाते आदी उपस्थित होते. कॅम्पमध्ये राशन कार्डसंबंधी विविध प्रश्न व अडचणी जाणून घेऊन नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सोसायटी संचालक सोमनाथ मुळे, माजी सरपंच धीरसिंग पवार, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, विशंभर शिंदे, सांडू चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाभार्थींना यावेळी योजनांची माहिती देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *